Illustration

सानप अ‍ॅग्री प्राइव्हॅट मार्केट

शेतकरी वर्गाची फसवणुक व लुट होवु नये, त्यांचे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा या करीता महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) नियम 1967 या कायद्याअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापन झालेली आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था असुन बाजार समितीचे कामकाज हे वरील कायद्यातील नियमांनुसार चालते.

कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाजावर तालुका स्तरावर म, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (Assistant Registrar) यांची, जिल्हा स्तरावर म. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (Deputy District Registrar) यांची व राज्य स्तरावर म. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची नियुक्ती असते. वरीष्ठ कार्यालयाकडुन बाजार समितीचे कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते.

Thumb

बाजार समितीची सर्वसाधारण माहिती

अ.नं. तपशिल माहिती
1 बाजार समितीची स्थापना दि. 18 जुलै 1985
2 पत्ता कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड चांदवड रोड, मनमाड 423104 ता. नांदगांव जि. नाशिक
3 दुरध्वनी क्र. एसटीडी कोडसहीत 02591-222273
4 ई मेल am_manmad@msamb.com
apmcmanmad85@gmail.com
5 अधिसुचित बाजार क्षेत्र नांदगांव तालुक्यातील 26 गांवे महाराष्ट्र शासनाचे दि. 18/07/1985 रोजीचे राजपत्रानुसार.
6 मुख्य बाजार आवाराचे ठिकाण/जमिन (हेक्टर मध्ये) सदर बाजार समितीचा अधिसुचीत केलेचा दिनांक मुख्य बाजार आवार, मनमाड उपबाजार नाही. एकुण जमिन 12 हे. 53 आर. अधिसुचीत दिनांक 18/07/1985